शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं जयंत पाटील म्हणाले. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापरही सुरु असल्याचं यावेळी जयंत पाटील म्हणाले. किरीट सोमय्या बोलतात आणि दोन तीन दिवसांनी कारवाई होते. त्यामुळे ‘ॲक्युरेट प्रेडीक्शन’ करणारे गृहस्थ म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात आहे. केंद्र सरकार कोणतीही कारवाई करण्याअगोदर त्याची कल्पना किरीट सोमय्या यांना देतात.